नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा शहादा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी यांचा शालेय विद्यार्थ्यांच्या एसटीच्या संदर्भातील समस्या जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांसमवेत अक्कलकुवा ते तळोदा एसटीतून प्रवास केला.
नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा मतदारसंघाचे आ. राजेश पाडवी यांनी तळोदा ते अक्कलकुवा दरम्यान रस्त्यावर प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या एसटी महामंडळाच्या माध्यमातून समस्या सोडविण्यासाठी व अडीअडचणी दूर करण्यासाठी स्वतः अक्कलकुवा ते तळोदा या एसटी महामंडळाच्या बसमध्ये विद्यार्थ्यांसमवेत प्रवास करून, यादरम्यान येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यांनी उपाययोजना करण्याची महामंडळाकडे मागणी केली आहे.
तळोदा तालुक्यातील गाव पाड्यासमवेत खेड्यावरील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते, अशी समस्या घेऊन काही दिवसांपूर्वी विद्यार्थी आमदार राजेश पाडवी यांना भेटले असता, आज स्वतः आमदार राजेश पाडवी यांनी अक्कलकुवा ते तळोदा या प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये विद्यार्थ्यांसोबत प्रवास करून,
तसेच प्रत्येक गाव पाड्यावरील विद्यार्थ्यांना सोबत घेत तालुक्यापर्यंत सोडण्याची व्यवस्था केली, तसेच संबंधित विभागाला सूचना करत प्रत्येक थांब्यावरील प्रत्येक पाड्यावरील विद्यार्थ्यांना घेण्यासाठी एसटी महामंडळास सूचना केल्या आहेत.








