Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

न्याहळोद येथे शहीद जवान मनोहर पाटील यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

team by team
September 7, 2022
in राष्ट्रीय
0
न्याहळोद येथे शहीद जवान मनोहर पाटील यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

धुळे  l

‘अमर रहे…, अमर रहे… शहीद जवान मनोहर पाटील… अमर रहे…’च्या घोषात आज सकाळी न्याहळोद, ता. धुळे येथे पांझरा नदीच्या काठावर शहीद जवान मनोहर पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला.

ऑपरेशन मेघदूत अंतर्गत सियाचीन ग्लेशियर येथे कार्यरत हवालदार मनोहर रामचंद्र पाटील यांना 16 जुलै 2022 रोजी तीव्र डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना सैन्य दलाच्या इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

तेथेच त्यांचा 5 सप्टेंबर 2022 रोजी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव आज सकाळी न्याहळोद येथे आणण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यानिमित्त ग्रामस्थांनी अंगणात रांगोळ्या रेखाटल्या होत्या. शालेय विद्यार्थी हातात तिरंगा घेवून ‘अमर रहे…, अमर रहे…शहीद जवान मनोहर पाटील..अमर रहे’सह भारत माता की जय, वंदेमातरमच्या घोषणा देत होते.

हवालदार मनोहर पाटील यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर खासदार डॉ. सुभाष भामरे, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज (रोहयो), तहसीलदार गायत्री सैंदाणे (धुळे ग्रामीण), सैन्य दलातर्फे कॅ. प्रतिक चिटणीस, संजयकुमार, सोनगीर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत पाटील, सैनिक कल्याण संघटक रामदास पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

पोलिस दल आणि सैन्य दलाच्या तुकडीने हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. माजी सैनिकांनीही शहीद जवान मनोहर पाटील यांना अभिवादन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

चौपाळे येथे गणेश विसर्जन मिरवणूकीत जमावबंदी आदेशाचे उल्लंंघन केल्याने २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

आ.राजेश पाडवी जेव्हा एसटीने प्रवास करतात, पुढे असे घडले

Next Post
आ.राजेश पाडवी जेव्हा एसटीने प्रवास करतात, पुढे असे घडले

आ.राजेश पाडवी जेव्हा एसटीने प्रवास करतात, पुढे असे घडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add