नंदूरबार l प्रतिनिधी
आर.पी.आय आठवले पक्षाची उत्तर महाराष्ट्र बैठक संपन्न झाली असून नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी अधिकृतपणे अरविंद कुंवर यांची फेनिवड करण्यात आली.
नुकतीच जळगाव येथील पद्मालय विश्रामगृहात जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यांची उत्तर महाराष्ट्र बैठक उत्तर महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष रमेश मकासरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सदर बैठकीस जळगाव धुळे व नंदुरबार येथील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जळगाव येथे 3 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या पक्षाच वर्धापन दिन साजरा करण्याबाबत उत्तर महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा विनिमय करण्यात आली. दरम्यान बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. रामदासजी आठवले तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांच्या आदेशान्वये पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मकासरे यांद्वारे निवडणूक प्रक्रिया पार पाडून नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्हाध्यक्षांची अधिकृतपणे निवड करण्यात आली.
यात नंदुरबार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी अधिकृतपणे अरविंद कुंवर यांची फेर निवड करण्यात आली. सदर निवड ही पुढील पाच वर्षांसाठी असेल. नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी आहे तशीच ठेवण्यात आली आहे.








