Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे बापरे: नंदूरबार येथून 1 हजार 120 किलो भेसळयुक्त गुलाल पोलिसांनी केला जप्त, एकास अटक

team by team
September 5, 2022
in क्राईम
0
अरे बापरे: नंदूरबार येथून 1 हजार 120 किलो भेसळयुक्त गुलाल पोलिसांनी केला जप्त, एकास अटक

नंदूरबार l प्रतिनिधी
श्री.गणेश विसर्जन काळात नंदुरबार शहरात विक्री करण्यासाठी येणारा 36 हजार 550 रुपये किमतीचा 1 हजार 120 किलो भेसळयुक्त गुलाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 31 ऑगस्ट 2022 रोजी पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सव काळात नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे यावर्षापासून गणेशोत्सव काळात गणेश मुर्तीची स्थापना / विसर्जन मिरवणूकीचे वेळी मुख्य मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या सर्व व इतर नोंदणीकृत मंडळांना नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत गणराया पुरस्कार देण्यात येणार आहे .

 

त्यासाठी विविध निकषांचा विचार करण्यात येणार आहे , त्यात गणेश मुर्तीची स्थापना व विसर्जन मिरवणूकीत गुलालाचा वापर न करता फुलांच्या पाकळ्यांचा वापर करणे याचा देखील समावेश आहे . सण उत्सवात भेसळयुक्त गुलाल व रंग याचा अतिरेकी वापर यामुळे तक्रारी प्राप्त होत आहेत . त्याअनुषंगाने अशा प्रकारच्या कारवाया करण्याचे आदेश नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी दिले होते . दि. 5 सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक शपी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , एक इसम ॲपे रिक्षामध्ये भेसळयुक्त गुलालाच्या गोण्या भरुन नंदुरबार शहरात विक्री करण्यासाठी येणार आहे. अशी माहिती मिळाल्याने, पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सदर बातमीबाबत सविस्तर माहिती घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना त्यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करुन भेसळयुक्त गुलालाच्या वाहनावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले .

 

मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . रविंद्र कळमकर व त्यांच्या पथकाने नंदुरबार शहरातील हाट दरवाजा पोलीस चौकीजवळ सापळा रचला . स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाहनांची तपासणी करीत असतांना नंदुरबार शहरातील गांधी पुतळ्याकडून हाट दरवाजाकडे येणारे एक ॲपे रिक्षा वाहन येतांना दिसुन आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अमंलदारांनी हाताच्या सहाय्याने त्यास उभे करण्याचा इशारा देवून सदर ॲपे रिक्षा वाहन थांबविले .

 

ॲपे रिक्षा चालकास स्थानिक गुन्हे शाखेच्या अमंलदारांनी आपली ओळख देवून चालकास नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव इकबाल दाऊद कुरेशी रा . गाझी नगर नंदुरबार असे सांगितले . वाहन चालकास वाहनात काय आहे ? बाबत विचारपुस करता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली म्हणून पथकाने दोन पंचासमक्ष वाहनाच्या मागील बाजूस पाहणी केली असता
त्यात गुलालाच्या गोण्या भरलेल्या मिळून आल्या . ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास त्याचे ॲपे रिक्षामध्ये मिळून आलेल्या गुलालाच्या गोण्या कोठून व कोठे घेवून जात आहे ? याबाबत विचारपूस केली असता त्याने काही एक समाधानकारक उत्तरे दिली नाही . तसेच गुलाल विकत घेतल्याबाबत सदर इसमाकडे बिल पावती मागितली असता त्याच्याकडे कोणतीही बिल पावती नसल्याचे त्याने सांगितले . सदर ॲपे रिक्षामध्ये 11 हजार 500 रुपये किमतीच्या 60 भेसळयुक्त गुलालाच्या गोण्या तसेच 25 हजार रुपये किमतीची एक ॲपे रिक्षा असा एकूण 36 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे. व त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे .

 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पो अधीक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधीकारी मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोह. वसावे , जितेंद्र तांबोळी , पोलीस नाईक राकेश मोरे , पोलीस शिपाई अभय राजपुत , आनंदा मराठे , रामेश्वर चव्हाण यांच्या पथकाने केली आहे .

 

गुलालाचा वापर केल्यामुळे मानवी त्वचेवर व शरीरावर दुष्परिणाम होतात . तसेच गुलालमुळे वायु प्रदुषण देखील मोठ्या प्रमाणावर होते . गुलालात विषारी रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो त्यामुळे कर्करोग , फुफ्फसाचे विविध आजार होण्याची शक्यता असते . गुलाल डोळ्यात गेल्यास डोळ्यांची दृष्टी देखील जाऊ शकते . गुलालामुळे विविध प्रकारचे रक्तांचे आजार देखील होऊ शकतात . त्यामुळे श्री.गणेश विसर्जन मिरवणूकीत गुलालाचा वापर न करता फुलांच्या पाकळ्यांचा वापर करावा . भेसळयुक्त गुलालाबाबत काही एक माहिती मिळाल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष , नंदुरबार 02564-210100 / – 210113 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आर.पी.आय आठवले पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदी अरविंद कुंवर यांची फेनिवड, उत्तर महाराष्ट्र बैठक उत्साहात

Next Post

आसाणे येथील तरुण शेतकर्‍यांची रोजच्या भारनियमाला व कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या

Next Post
आसाणे येथील तरुण शेतकर्‍यांची रोजच्या भारनियमाला व कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या

आसाणे येथील तरुण शेतकर्‍यांची रोजच्या भारनियमाला व कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add