नंदुरबार | प्रतिनिधी
शासकीय अधिकारी व कर्मचार्यांशी उद्धटपणे वागणूक देऊन बेताल वक्तव्य करणार्या लोकप्रतिनिधींना राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी आवर घालण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघातर्फे करण्यात आली आहे .
यासंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्याचे कारभारी म्हणून मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी बेताल आमदार व लोकप्रतिनिधींना वेळीच आवर घालावी.आमदार संतोष बांगर यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्तांना फोनवरून असभ्य भाषेत दमदाटी केली.
कोरोना काळात आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता अहोरात्र राज्यातील जनतेची सेवा केली.आजही राज्यात अतिवृष्टीने जनता हवालदिल झाली आहे.अशा परिस्थितीत कर्मचारी रात्रंदिन कार्यरत असताना लोकप्रतिनिधींनी संयम दाखवत अधिकार्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे.त्याऐवजी आमदार बांगर यांनी असभ्यपणे उद्धट भाषेत बोलणे उचित नाही.अन्यथा कर्मचार्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.असेही राज्य उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, सरचिटणीस सुभाष गांगुर्डे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे म्हटले आहे.








