नंदुरबार l
नवापूर शहरातील सिनिअर कॉलेज रस्त्यावर दुचाकीवर आलेल्यांनी मोबाईल बोलणाऱ्या एकाच्या हातातून मोबाईल हिसकावून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहरातील जनता पार्क येथील जयकिशन काशिराम वळवी हे साईबाबा मंदिराच्या पुढे सिनिअर कॉलेज रस्त्यावर मोबाईल फोनवर बोलतांना घरी जात होते.
यावेळी दोन अनोळखी इसम एकाने निळ्या रंगाचा टी-शर्ट व दुसऱ्याने पिंक रंगाची कॅप घातलेल्या अंदाजे २५ ते ३० वयोगटातील इसम दुचाकीवर मागून येवून जयकिशन वळवी यांच्या हातातील ७ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरस्तीने हिसकावून घेत पळून गेले.
याबाबत जयकिशन वळव यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात दोघा अज्ञात इसमांविरोधात भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ करीत आहेत.








