नंदुरबार l
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एका पेट्रोल पंपावर उभा असलेला डंपर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील रऊफ रशिद खाटीक यांचा मालकीचा डंपर सारंगखेडा येथील श्रीकृष्ण पेट्रोल पंपाजवळ उभा केला. चोरट्यांनी संधी साधून ५७ लाखांचा डंपरच पळविला रुपये किंमतीचा डंपर (क्र.एम.एच.३९ एडी २२२७) लंपास केला.
याबाबत रऊफ रशिद खाटीक यांच्या फिर्यादीवरुन सारंगखेडा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान कोळी करीत आहेत.








