नंदुरबार l
जुनवणे, ता. शहादा येथील रहिवासी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले डॉ. सागर दिलीप पाटील यांची कन्या स्वर्णिम पाटील हिचा सर्वात कमी वयात एका मिनिटात जास्तीत जास्त मानवी शरीराच्या अवयवांची ओळख करून दिल्याने तिच्या विक्रमाची नोंद वर्ल्ड वाईड बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार तसेच पुणे येथील पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या हस्ते स्वर्णिमचा गौरव करण्यात आला. स्वर्णिम ही पुणे येथील दंतरोग तज्ज्ञ डॉ.सागर पाटील व डॉ. शिवानी पाटील यांची कन्या आहे. तिने हा विक्रम दोन वर्षे ११ महिने या वयात केला आहे. सर्वात कमी वयात हा विक्रम केलेला भारतीय बालक म्हणून त्याची नोंद घेण्यात आली आहे.








