नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे ग्रामीण फोटोग्राफर संघ आयोजित धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण छायाचित्रकार यांचा व्यवसाय बघता धावपळीचा असतो त्या अनुषंगाने व छायाचित्रकारांसाठी सरकारची कोणत्याही प्रकारे शासकीय अनुदानाची योजना नाहीत याच विचार करून आपल्या परिवाराच्या संरक्षनासाठी संघटनेने नंदुरबार येथे एकत्र येऊन योग्य पाउल उचलत स्व खर्चाने भारतीय पोस्टल विभागाची 10 लाखाची विमा योजने अंतर्गत 399 रु चा प्रत्येकी विमा काढण्यात आला.
तसेच बचत खाते ही उघडण्यात आले.जवळपास 30 ते 35 छायाचित्रकारांचे विमा काढण्यात आले.त्यामुळे सर्व छायाचित्रकार बांधवांत आनंदाचे वातावरण होते.
काय आहेत योजनेची वैशिष्ट्ये-
या योजनेत व्यक्तीला अवघ्या 299 किंवा 399 रुपयांच्या हप्तामध्ये एका वर्षात 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळवू शकते. यामध्ये विमाधारकाचा अपघाती मृत्यू (Accidental Death), अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाईल. याशिवाय या विम्यामध्ये रुग्णालयात दाखल झाल्यास 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरी उपचार घेतल्यास 30 हजार रुपयांपर्यंतचा दावाही दाखल करता येईल.
त्याचबरोबर य रुग्णालयाच्या खर्चासाठी (Hospital Expenditure) 10 दिवस तुम्हाला प्रति दिन एक हजार रुपयेदेखील मिळतील. कुटुंबाला वाहतुकीसाठी 25 हजार रुपयांपर्यंतचा खर्चदेखील मिळणार आहे. कोणत्याही कारणाने अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी 5 हजार रुपये व या विम्यांतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यतची रक्कम देण्यात येणार आहे.
यावेळी पोस्ट विभागाचे विजय पाटील यांची खूप मोठी मदत झाली.यावेळी ग्रामीण छायाचित्रकार संघाचे अध्यक्ष मनोज पवार , उपाध्यक्ष संदीप सोनवणे, सचिव मल्हारी पाटील,मार्गदर्शक गणेश छोटू पाटील,बंडू पाटील,रविंद्र पाटील,संदीप पाटील,प्रवीण मोरे,योगेश सोनवणे,परेश पाटील,राहुल पाटील,रतीलाल कोळी हजर होते.








