नंदुरबार l
नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक या ब्रिद वाक्याखाली मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाला नंदुरबारात सुरुवात झाली आहे. अभियानाच्या पहिल्याच दिवशी नंदुरबार बसस्थानक आयोजित सदस्य नोंदणीला युवकांकडून मोठ्यज्ञा प्रमाणात उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये राज्यभर मनसेची प्राथमिक सदस्य नोंदणी सुरु करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणुन उत्तर महाराष्ट्रचे संपर्क अध्यक्ष विनयजी भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नंदुरबार येथील बसस्थानक परिसरात सदस्य नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी यांच्या हस्ते मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीला सुरुवात झाली. मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक या ब्रिद वाक्याखाली सुरु केलेल्या मनसेच्या सदस्य नोंदणीला युवकांकडून उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी मनसेचे नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनील कोकणी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, मनसे विद्यार्थी सेनेचे राम ठक्कर, रामसिंग भिल, अनिल पेंढारकर, प्रसिध्दी प्रमुख कल्पेश माळी, रोहित कोकणी, रोहित थोरात, पवन माळी, पंकज कोकणी, निलेश गायकवाड आदी उपस्थित होते.








