नंदुरबार l प्रतिनिधी –
भारतीय जनता पार्टी प्रदेशाचे अध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करावे असे आवाहन आदिवासी विभागाचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

नंदुरबार येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय “विजयपर्व” येथे झालेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ना.डॉ.विजयकुमार गावित बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी होते.
याप्रसंगी बोलताना डॉ.विजयकुमार गावित म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच नंदुरबार येत असल्याने कार्यक्रम गुणात्मक व संख्यात्मक दृष्टिकोनातून चांगला झाला पाहिजे असे देखील डॉ.विजयकुमार गावित यांनी यावेळी सूचित केले. यावेळी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे एक प्रभावशाली नेते असून प्रभावशाली वक्ते देखील आहे त्यांच्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यामुळे संघटनात्मक बळकटी प्राप्त होणार असून दि
13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या त्यांच्या आगमनानिमित्त सर्व कार्यकर्त्यांनी तन-मन-धन समर्पित भावनेने स्वागतासाठी सज्ज व्हावे व कार्यक्रम ऐतिहासिक करावा असे देखील आव्हान भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले.
यावेळी मंचावर भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, सरचिटणीस राजेंद्र गावित, सरचिटणीस जितेंद्र जमदाडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य दीपक बापू पाटील, आदिवासी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, तालुकाध्यक्ष भरत गावित, तळोदा नगराध्यक्ष अजयभैया परदेशी जिल्हा सचिव संदीप अग्रवाल आदी उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या प्रथेप्रमाणे वर्ग गीताने सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश माळी यांनी केले. तर आभार प्रकट राजेंद्र गावित यांनी केले. यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








