Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे 3 सप्टेंबरला जिल्हा अधिवेशन

team by team
September 1, 2022
in राज्य
0
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे 3 सप्टेंबरला जिल्हा अधिवेशन

नंदुरबार  l

येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ नंदुरबार जिल्हा शाखेच्या वतीने भव्य त्रैवार्षिक खुले नंदुरबार जिल्हा अधिवेशन शनिवार दि.03 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा करुन त्या सोडविण्याबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे. सदर अधिवेशनामध्ये जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात योगदानासह उत्कृष्ट काम करणार्‍या शिक्षकांचा सन्मान सोहळा आणि संघाची पुढील जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात येणार आहे. या खुले अधिवेशनाला जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघातर्फे करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघातर्फे नंदुरबार येथील गिरीविहार वाडी, तळोदा रोड याठिकाणी दि.3 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता प्राथमिक शिक्षक संघाचे खुले जिल्हा अधिवेशन भरविण्यात येणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते मा.संभाजीराव थोरात, राज्याध्यक्ष मा.अंबादास वाजे, राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप, राज्य कार्याध्यक्ष पोपटराव सुर्यवंशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.

अधिवेशनामध्ये नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबवुन आदर्शदायी काम करणार्‍या शिक्षकांचा सन्मानपत्र देवुन गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध अडीअडचणी, समस्या व त्या सोडविण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची नंदुरबार जिल्हा कायर्यकारिणी चर्चा करुन गठीत करण्यात येईल. खुले जिल्हा अधिवेशनाला नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष हंसराज पाटील, सरचिटणीस संजय बागुल, जिल्हा नेते वसंतराव पाटील, राज्य उपाध्यक्ष किशोर पाटील, राज्य सहसचिव सतिष पाटील व पदाधिकार्‍यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बोरद वगळता परिसरात सर्वत्र गणपतीची मोठ्या उत्साहात स्थापना

Next Post

चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा यशस्वी करा : ना.डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

Next Post
चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा यशस्वी करा : ना.डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा यशस्वी करा : ना.डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add