नंदुरबार l
येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ नंदुरबार जिल्हा शाखेच्या वतीने भव्य त्रैवार्षिक खुले नंदुरबार जिल्हा अधिवेशन शनिवार दि.03 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा करुन त्या सोडविण्याबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे. सदर अधिवेशनामध्ये जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात योगदानासह उत्कृष्ट काम करणार्या शिक्षकांचा सन्मान सोहळा आणि संघाची पुढील जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात येणार आहे. या खुले अधिवेशनाला जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघातर्फे करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघातर्फे नंदुरबार येथील गिरीविहार वाडी, तळोदा रोड याठिकाणी दि.3 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता प्राथमिक शिक्षक संघाचे खुले जिल्हा अधिवेशन भरविण्यात येणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते मा.संभाजीराव थोरात, राज्याध्यक्ष मा.अंबादास वाजे, राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप, राज्य कार्याध्यक्ष पोपटराव सुर्यवंशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.
अधिवेशनामध्ये नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबवुन आदर्शदायी काम करणार्या शिक्षकांचा सन्मानपत्र देवुन गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध अडीअडचणी, समस्या व त्या सोडविण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची नंदुरबार जिल्हा कायर्यकारिणी चर्चा करुन गठीत करण्यात येईल. खुले जिल्हा अधिवेशनाला नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष हंसराज पाटील, सरचिटणीस संजय बागुल, जिल्हा नेते वसंतराव पाटील, राज्य उपाध्यक्ष किशोर पाटील, राज्य सहसचिव सतिष पाटील व पदाधिकार्यांनी केले आहे.








