Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा राबविण्यात नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात दुसरा

team by team
September 1, 2022
in क्राईम
0
गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा  राबविण्यात नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात  दुसरा
नंदूरबार l प्रतिनिधी
 नंदुरबार जिल्ह्याची ओळख महाराष्ट्रात आदिवासी जिल्हा किंवा अतिदुर्गम जिल्हा म्हणून आहे . असे असतांना देखील नंदुरबार जिल्ह्याने ‘ गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा ‘ अर्थातच ( CCTNS ) प्रणाली राबविण्यात महाराष्ट्रात दुसरा क्रमांक पटकावून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे .
 CCTNS प्रणालीची सुरुवात महाराष्ट्रात सन 2015 मध्ये झाली असून CCTNS प्रणालीत पोलीस ठाणे स्तरावर दैनंदिन होणाऱ्या प्रत्यक घडामोडींची ऑनलाईन नोंदी घेण्यात येत असते , त्यात प्रथम खबर अहवाल ( FIR ) , स्टेशन डायरी नोंदी , अटक आरोपींच्या नोंदी , तसेच पोलीस ठाण्यात हस्तलिखीत होणाऱ्या सर्व नोंदी ह्या आता CCTNS प्रणालीत संगणकाद्वारे ऑनलाईन पध्द्तीने घेण्यात येत असतात .
प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी संबंधीत कर्मचाऱ्यांकडुन CCTNS प्रणालीत दैनंदिन डाटा फिडींगचे काम करुन घेत असतात आणी त्यावर प्रत्यक्ष पर्यवेक्षण नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांच्याकडुन होत असते . गुन्हेगारांवर वचक ते सामाजिक बांधीलकी सोबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला तंत्रज्ञानाला देखील मागे पडू दिलेले नाही .
महाराष्ट्रातील 36 जिल्हे व 11 पोलीस आयुक्तालयात महाराष्ट्र शासनाचा सुरु असलेला CCTNS प्रणाली राबविण्यात नंदुरबार जिल्ह्याने 232 पैकी 222 गुण प्राप्त करून महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे . नंदुरबार जिल्ह्यात इंटरनेटचा स्पीड , सुरळीत नसणारा वीज पुरवठा व इतर अत्याधुनिक सुविधा नसतांना देखील CCTNS प्रणाली राबविण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्र पोलीस दलात आपली एक – नवी ओळख निर्माण केलेली आहे आणि याचे संपूर्ण श्रेय अर्थातच नंदुरबार जिल्हा पोलीसांना जाते .
 नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात CCTNS चे मुख्य सर्व्हर असून त्याठिकाणी सहा . पोलीस निरीक्षक नयना देवरे व त्यांचे पथक असुन पोलीस ठाणे स्तरावर दैनंदिन ऑनलाईन फिडींगच्या कामावर ते देखरेख ठेवतात . तसेच पोलीस ठाण्याला येणारे तांत्रिक व इतर अडचणींबाबत ते पोलीस ठाण्याला जावून ते सोडवित असतात .
नंदुरबार सारख्या अतिदुर्गम किंवा आदिवासी जिल्ह्यात CCTNS प्रणाली राबवुन ती यशस्वी करणे हे एकप्रकारे नंदुरबार जिल्हा पोलीस दलासाठी आवाहन होते , कारण नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव , मोलगी , अक्कलकुवा व इतर ग्रामीण भागात इंटरनेटच्या वेगाची मर्यादा नंदुरबार जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांपेक्षा कमी असते , त्यातच वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा अशा अनेक अडचणींवर मात करुन पोलीस प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजाची दिलेल्या विहीत वेळेत व जास्तीत जास्त ऑनलाईन फिडींग करुन नंदुरबार जिल्हा CCTNS टीमने जुलै -2022 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय स्थान पटकावून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे .
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील , नंदुरबार जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी  सचिन हिरे , शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे , अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत , स्थानिक गुन्हे शाखा , नंदुरबारचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा . पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे , पोलीस नाईक राजेंद्र मोरे व नंदुरबार जिल्ह्यातील CCTNS चे काम पाहणारे पोलीस अमंलदार यांचे पथकाने केलेली आहे .
 तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर . पाटील यांनी सर्व टीमचे अभिनंदन करुन त्यांना रोख बक्षीस देखील जाहीर केले आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हयात गणरायाचे जल्लोषात आगमन, मानाच्या श्री.दादा व श्री. बाबा गणपतींचीही उत्साहात स्थापना

Next Post

काठी येथे सर्पदंशाने विवाहित तरुणीचा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नागरिकांचे ठिय्या आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add