Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गणेशोत्सव काळात डी . जे . व डॉल्बी सिस्टिमवर बंदी , वापर केल्यास होणार कठोर कारवाई : पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांचा इशारा

team by team
August 30, 2022
in क्राईम
0
पोलिसांनी उभारलेल्या शिक्षणसेतु नंतर शिक्षकाने व्यक्त केलेल्या भावना होत आहे सोशल मीडियावर व्हायरल

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबार जिल्हयात गणेशोत्सव काळात डी . जे . व डॉल्बी सिस्टिमवर बंदी घालण्यात आली असून वापर केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले.

 

नंदुरबार जिल्ह्यात मागील काही दिवसात साजरे झालेले रमजान ईद , शिवजयंती , विविध महापुरुषांच्या जयंती , रामनवमी , मोहरम , विश्व आदिवासी गौरव दिन तसेच आगामी काळात साजरे होणारे गणेशोत्सव काळात डी . जे . व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपरिक वाद्य वाजवावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले होते . नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळानी पोलीस दलाच्या आवानास उत्तम असा प्रतिसाद देत पारंपरिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डी . जे . मुक्त व डॉल्बी मुक्त करण्याचा प्रयत्न केला होता . त्यामुळे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ . बी . जी . शेखर पाटील यांचे हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील 235 मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना प्रशंसापत्र देवून सत्कार करण्यात आला होता . डी . जे . व डॉल्बी मुक्त नंदुरबार जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्याची ओळख निर्माण झाली होती 31 ऑगस्ट रोजी पासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे . गणेशोत्सव काळात गणेश मुर्तीची स्थापना, विसर्जन मिरवणुकीचे वेळी ध्वनी प्रदुषण निर्माण होईल अशी साधने डी . जे . व डॉल्बी यांचा वापर करण्यावर ध्वनी प्रदुषणाचे नियंत्रण व नियमन तसेच नंदुरबार जिल्ह्यातील सण व उत्सव साजरे करतांना डी . जे . व डॉल्बी सिस्टीमवरून उच्च आवाजात गाणी वाजविल्यामुळे ध्वनी प्रदुषण होवून सार्वजनिक शांततेचा भंग होतो .

 

तसेच डी . जे . व डॉल्बीच्या उच्च आवाजामुळे वृध्द् इसम , आजारी इसम , लहान बालके यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो . त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी दि. 31 ऑगस्ट ते दि. 9 सप्टेंबर पर्यंत डी.जे. डॉल्बी सिस्टिमवर बंदी घातली आहे. व त्याबाबतचे सविस्तर आदेश देखील निर्गमीत केलेले आहे . नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी डी . जे . व डॉल्बी सिस्टिमचा वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे . गणेशोत्सव काळात डी.जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपरिक वाद्य वाजवावे . डी . जे . व डॉल्बीचा वापर केल्यास संबंधीतांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले आहे .

 

तसेच गणेशोत्सव काळात समाजातील काही विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मुद्दाम सोशल मिडीयाच्या माध्यमातून खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवून नागरीकांमध्ये भितीचे व दहशतीचे वातावरण निर्माण करु शकतात त्यामुळे नागरीकांनी व्हॉट्सऍप , इंस्टाग्राम , ट्वीटर , फेसबुक इत्यादी समाज माध्यमांद्वारे चुकीची माहिती, अफवा प्रसारित करु नये . सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की , गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदुषण ( नियम व नियंत्रण ) सन 2000 म . जिल्हा माहीती अधिकारी , नंदुरबार संपादक चे उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण कायदा कलम 15 प्रमाणे 5 वर्ष कैदेची किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होवु शकतात .

 

तसेच शिक्षा होवून सुध्दा असे गुन्हे केल्यास 5 हजार रुपये दंड प्रत्येक दिवसाला व शिक्षा लागल्याच्या 1 वर्षापर्यंतच्या काळात पुन्हा असे गुन्हे केल्यास 7 वर्षापर्यंतची शिक्षा होवू शकते , त्यामुळे गणेशोत्सव काळात कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीचे ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा उपयोग मयदिपेक्षा मोठ्या आवाजात करु नये , तसे आढळुन आल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष , नंदुरबार 02564-210100 / 210113 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे . जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिलांसह 10 पिडीत महिला ताब्यात , स्थानिक गुन्हे शाखेची नंदुरबार शहरात धडक कारवाई

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात ८९८ गणेश मंडळांची स्थापना करण्यात येणार

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात ८९८ गणेश मंडळांची स्थापना करण्यात येणार

नंदुरबार जिल्ह्यात ८९८ गणेश मंडळांची स्थापना करण्यात येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add