नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार तालुका विधायक समिती संचलीत माध्यमिक विद्यालय शेजवा पो.पिंपळोद ता.जि.नंदूरबार शाळेत जागतीक क्रीडा दिवस व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक दत्तु पाटील हे होते. त्याच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे क्रीडा शिक्षक विजय पवार यांनी केले. यावेळी शाळेतील इ.5वी, ते इ.10वी च्या विद्यार्थ्यांच्या खोखो, लंगडी, धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक दत्तु पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या जोश व उत्सव दिसून आला. यावेळी मुख्याध्यापक श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजावून सांगितले बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास सुद्धा झाला पाहिजे याविषयी आपले मत विद्यार्थ्यांसमोर मांडले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन शाळेचे उपशिक्षक संजय बोरसे यांनी मानले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे उपशिक्षक दिपक वळवी , रामानंद बागले, हारूणखाँ शिखलीगर, शाळेच्या लिपिक नेहा शर्मा, शिपाई दिनेश पवार यांनी स्पर्धा आयोजन नियोजनाचे काम पाहिले .कार्यक्रमात शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येत उपस्थित होते . कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरम गीताने करण्यात आला.









