नंदुरबार l प्रतिनिधी
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील खापर गावाच्यापुढे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करतांना आढळून आल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील खापर गावाच्या पुढे राहूल उत्तम वळवी (रा.मक्राणीफळी ता.अक्कलकुवा), जयसिंग तापसिंग वळवी (रा.मिठ्याफळी ता.अक्कलकुवा) व विनेशभाई भारजीभाई वसावा (रा.सोरपाडा ता.अक्कलकुवा) या तिघांनी त्यांच्या मालकीच्या वाहनात जनावरांना डांबून निर्दयतेने कोंबून चारापाण्याची सोय न करता व वाहनाची क्षमता नसतांना कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करतांना आढळून आले.
याबाबत पोना.सुनिल पवार यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कलम 11 (1) (अ) (ड) (इ) (फ) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 6/9 मोटार वाहन कलम 66 (1)/192 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास वडघुले करीत आहेत.








