Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रजाळ्यात वीज प्रवाह सुरु असलेला जीर्ण विद्युत खांब खालून तुटला, सुदैवाने जीवितहानी टळली

team by team
August 22, 2022
in सामाजिक
0
रजाळ्यात वीज प्रवाह सुरु असलेला जीर्ण विद्युत खांब खालून तुटला,  सुदैवाने जीवितहानी टळली
नंदुरबार ।
तालुक्यातील रजाळे येथील ठेलारी-आदिवासी वसाहतीत घरासमोरील असलेल्या विजेच्या खांबाची दुरवस्था झाल्यामुळे येथील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा विजेचा खांब खालच्या बाजूनी पूर्णपणे गंजून गेल्याने तो  22 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास वीज प्रवाह सुरू असताना अचानक पडला.
सुदैवाने यावेळी कोणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे. मात्र वारंवार जीर्ण विद्युत तारा व खांब तुटून पडत असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्युत वितरण कंपनीचा आडमुठेपणामुळे गावात असे चित्र दिसून येत आहे. संबंधित विद्युत वितरण विभागाने लक्ष घालावे अशा संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांमध्ये होऊ लागल्या आहे.
गावामध्ये अनेक ठिकाणी विद्युत खांब, तारा जीर्ण झाल्या आहेत. तसेच काही दिवसापूर्वी या वस्तीमध्ये विद्युत केबल टाकण्यात आली मात्र पोल जैसे थे असल्याने ही घटना घडली आहे. याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. महावितरण वीज बिल जर सक्तीने वसुली करीत असेल तर ग्राहकांना सहकार्य करणे हे वीज मंडळाचे नैतिक कर्तव्य आहे.
मात्र याकडे डोळेझाक करीत आहे. या ठिकाणी घरे तसेच लहान मुले खेळण्यासाठी येत असतात, अशा वेळी अपघातांची समस्या नाकारता येत नाही. तसेच पावसाळा सुरू असून यामुळे विजेच्या शॉक लागण्याची शक्यता असते. अशावेळी वीज मंडळ अधिकारी यांनी लक्ष घालून या ठिकाणी नवीन खांब बसवावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.
तसेच ठेलारी वस्तीत जीर्ण झालेला विद्युत खांब दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात यावा अशी मागणी येथील सावळीराम शिवाजी करिया , धनराज सखाराम भील, देविदास सखाराम भील, कृष्णा मरिबा ठेलारी , भिवा मरीबा ठेलारी , बायजाबाई शिवा ठेलारी, हंबर शिवा ठेलारी, कंगा भिवा ठेलारी या रहिवाशांनी केली आहे. घटना घडताच ग्रामपंचायत प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर विद्युत वितरणला या घटनेची माहिती देण्यात आली.
बातमी शेअर करा
Previous Post

सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ३ हजार ९४३ जि.प. प्राथमिक शिक्षकांचे बदली आदेश जारी

Next Post
ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ३ हजार ९४३ जि.प. प्राथमिक शिक्षकांचे बदली आदेश जारी

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ३ हजार ९४३ जि.प. प्राथमिक शिक्षकांचे बदली आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add