नंदुरबार l
तालुक्यातील सुंदरदे, करणखेडा, वंजारीपाडा, नारायणपुर, बिलाडी, नळवे या परिसरातुन गेल्या एक महिन्यापासून शेतकऱ्यांच्या शेतातुन विद्युत मोटार केबल व ठिबकचे साहित्य चोरी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली असून कारवाई करावी या आशयाचे निवेदन उपनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले.
यासंदर्भात पोलिसांनी चोरट्यांना पकडून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी मदत करावी असे आवाहन शेतकरी करीत असून योग्य न्याय न मिळाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा या परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे
.निवेदनावर सुंदरदे, करणखेडा, नंदुरबार शिवार वंजारीपाडा, नारायणपुर, बिलाडी, नळवे शिवारातील शेतकरी शिवसेना महानगर प्रमुखपंडीत कौतिक माळी,विजय बळीराम माळी,दादा पाटीलभाउ माळी,किशोर मधुकर माळी, सोमनाथ महारू माळी,विजय पितांबर सूर्यवंशी,ब्रिजलाल त्रंबक माळी, दिनेश पुन्या वळवी,न्हानु आत्माराम माळी, रमेश वंजारी,जितेंद भिमराव माळी,प्रसाद सुकदेव माळी,शांताराम महारू माळी,धनराज गोविंद भोई अदिच्या सहया आहेत.








