नंदुरबार l
येथील नाभिक समाजातर्फे संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दि.23 ऑगस्ट 2022 रोजी संत सेना महाराज यांच्या प्रतिमा पुजनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नंदुरबार शहर नाभिक पंचमढी ट्रस्ट मंडळ, नंदुरबार शहर नाभिक हितवर्धक संस्था, नंदुरबार शहर नाभिक दुकानदार संघटना, नंदुरबार शहर नाभिक युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांची पुण्यतिथी दि.23 ऑगस्ट 2022 रोजी साजरी करण्यात येणार आहे. यावर्षी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि.23 ऑगस्ट रोजी नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराच्या डोममध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यात सकाळी 9 वाजता सत्यनारायणाची महापुजा, सकाळी 10 वाजता संत सेना महाराजांचे प्रतिमापुजन व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होईल. तसेच सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर होणार आहे. तसेच संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी नाभिक समाजबांधवांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवावी. त्याचबरोबर कार्यक्रमांच्या दिवशी समाज बांधवांसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या कार्यक्रमांना नाभिक समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नंदुरबार शहर नाभिक पंचमढी ट्रस्ट मंडळ, नंदुरबार शहर नाभिक हितवर्धक संस्था, नंदुरबार शहर नाभिक दुकानदार संघटना, नंदुरबार शहर नाभिक युवा मंच यांच्याकडून करण्यात आले आहे.








