नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा संस्था चालक संघटनेची सर्वसाधारण सभेची बैठक महाराष्ट्र राज्य संस्थाचालक संघटनेचे कार्यवाह तथा नंदुरबार संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष मा.आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आज झराळी, नंदुरबार येथे रोजी घेण्यात आली .
या बैठकीत श्री.रघुवंशी यांनी मार्गदर्शन करतांना जिल्यातील शिक्षण विभागाच्या विविध अडचणीबाबत सर्व संस्था चालकांनी एकत्रित काम करणे आवश्यक असून येणाऱ्या विविध अडचणी बाबत जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांची चर्चा करण्यात येईल, त्याचप्रमाणे शिक्षण विभागाच्या राज्यात सर्व ठिकाणी सारख्याच अडचणी व प्रश्न असून या मागण्या संदर्भात लवकरच शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे बैठक घेण्याबाबत विनंती करण्यात येईल.
व टप्प्याटप्प्याने आपल्या मागण्या कशा मान्य करता येतील याबाबत आग्रह धरण्यात येईल. त्याचप्रमाणे आदिवासी विकास मंत्री आपल्या जिल्ह्याचे असल्यामुळे आदिवासी आश्रम शाळांचे विविध प्रश्न लवकरच सोडण्यास ते सहकार्य करतील असे श्री.रघुवंशी यांनी प्रतिपादन केले .
त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाने झारखंड राज्याच्या एका प्रकरणाबाबत शिक्षकांना पेसा कायद्यातून वगळण्यात यावे व इतर संवर्गातील उमेदवारांना सुद्धा भरती प्रक्रिया सहभागी करण्यात यावे याबाबत नुकताच निर्णय दिला असून त्या निर्णयासंदर्भात शासन पातळीवर लवकरच पत्र व्यवहार करण्यात येईल व पेसा कायदा मधून शिक्षक पदे वगळण्याबाबत विनंती करण्यात येईल असे विभागीय सचिव नाशिक विभागीय आश्रम शाळा संस्थाचालक संघटना युवराज पाटील यांनी माहिती दिली.
प्र. अध्यक्ष ,नंदुरबार जिल्हा संस्थाचालक संघटना यशवंत पाटील यांनी सर्वसाधारण सभेतील सर्व ठराव मांडून ते मंजूर करण्याबाबत विनंती केली, त्याप्रमाणे सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले .या बैठकीला नंदुरबार जिल्ह्यातील जवळ जवळ 50 शिक्षण संस्था चालक उपस्थित होते.
या बैठकीला राजेंद्र कुमार गावित , अभिजीत मोतीलाल पाटील , कांतीलाल टाटिया,सचिव रोहिदास राठोड ,विभागीय सचिव डॉ.एन.डी. नांद्रे , भास्करराव पाटील , निखिल तुरखीया , चेतन कुमार पवार, जितेंद्र पाटील, ॲड.पी.बी.चौधरी, डॉ. वसंत भाई चौधरी, श्रीमती उर्मिला गावित, श्री फारुख भाई पठाण ,हजहर सय्यद ,शेख वखार हसून , बच्चू सिंग परदेशी, लक्ष्मण माळी, नरेश कांकरिया ,निखिल वाणी, प्रताप कदमबांडे, राजेंद्र पटेल, विशाल पाटील, मधुकर पाटील, इत्यादी संस्था चालक उपस्थित होते. बैठकीचे आयोजनासाठी पुष्पेंद्र रघुवंशी यांनी सहकार्य केले
Attachments area








