नवापूर l प्रतिनिधी
वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक वन्यजीव वनक्षेत्र स्टाफ नवापूर यांच्यासह नवापूर शहरात मध्यरात्री रात्री गस्त घालत असताना एक संशयित वाहन अवैधरित्या जळाऊ लाकडाची वाहतूक करताना आढळून आले. त्याचा अटकाव करून तपासणी केली असता, सदर वाहनात तीन ते साडेतीन लाख रुपयांचा जळाऊ लाकूड मिळून आले. सदरचे वाहन पथकाने मुद्देमालासह नवापूर विक्री आगार येथे जमा केले आहे.
सविस्तर वृत्त असे की १९ ऑगस्ट रोजी च्या मध्यरात्री नवापूर वनक्षेत्रपाल प्रादेशिक वनक्षेत्र स्टाफ नवापूर यांच्यासह मध्यरात्री गस्त घालित असताना पथकाला तपकिरी रंगाचे (एम.एच. १८, ए.ए.७२४५) वाहन संशयितरित्या पंचायत माल वाहतूक करताना दिसून आला. या वाहनाला अडवून त्याची तपासणी केली असता या मालावर कुठलेही पावती वगैरे नसल्याने अवैध्यरित्या त्याची वाहतूक होत असल्याचा पथकाच्या लक्षात आले.
सदर वाहन लाकडासह जप्त करत नवापूर विक्रीयागार येथे पावतीने जमा करण्यात आले आहे जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत तीन ते साडेतीन लाख रुपये सांगण्यात आले आहे. ही कारवाई वनसंरक्षक धुळे दि.वा.पगार,
उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा लक्ष्मण पाटील, सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक वन्यजीव नंदुरबार धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक स्नेहल अवसरमल, वनपाल वडकळंबी सुनीता पाटील, वनरक्षक कल्पेश अहिरे, संतोष गायकवाड वाहन चालक दिलीप गुरव यांच्या पथकाने केली आहे.