नंदूरबार l प्रतिनिधी
का.वि. प्र.संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु.पाटील माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर ता. जि. नंदुरबार येथे दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर भास्करराव पाटील होते. प्रमुख पाहुणे विद्यालयाच्या प्राचार्या सौ. विद्या चव्हाण ,पर्यवेक्षक ए.व्ही.कुवर, प्राध्यापक,शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आले. त्यात लहान गट व मोठा गट करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांची पूजा चंद्रशेखर भास्करराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. प्राचार्या सौ.विद्या चव्हाण ,पर्यवेक्षक ए.व्हीं.कुवर उपस्थित होते.त्या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक बी.बी. भदाणे यांनी गीत सादर केले. विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य सादर केले शिक्षक एस.एस. पाटील ,सौ.एस.पी.पाटील यांनी विद्यार्थ्यांचा सराव व पटांगण आखुन घेतले.
कला शिक्षक विलास ठाकरे सरांनी दहीहंडी व रंगकाम व विद्यार्थ्यांची वेशभूषा केल्या.तसेच सर्व महिला शिक्षकांनी विद्यार्थिनींचा पेराव श्रीकृष्णाची वेशभूषा तयार करण्यासाठी मदत केली.
कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या गटाने दहीहंडी फोडली . कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन नियोजन प्राचार्या सौ.विद्या चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.








