नंदूरबार l प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के . आर . पब्लिक स्कुल , ज्यु . कॉलेज नंदुरबार येथे श्रीकृष्ण जन्मानिमित्त शाळेत दहिहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला .

या कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्णांची प्रतिमेचे पूजन करण्यात आले . शाळेच्या प्राचार्या छाया शर्मा यांनी श्रीकृष्णाच्या वेशभूषेत आलेल्या चिमुकल्यांचे कौतुक करीत श्रीकृष्ण जन्माची कथा सांगत कार्यक्रमात सहभागी झाले . शिशुकुंज विभागातील विद्यार्थ्यांनी राधा कृष्णाच्या वेशभुषेत आलेल्या चिमुकल्यांनी दहि हंडी फोडली तसेच शाळेतील इयत्ता 11 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांनी चार थररचित हंडी फोडण्याचा आनंद घेतला . या सर्व गोविंदानी नाचत खेळत दही हंडी फोडण्याचा उत्सव मोठया आनंदाने साजरा केला .
संस्थेचे चेअरमन किशोरभाई वाणीच्या समवेत हा सोहळा पार पडला . या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना संस्थेचे चेअरमन किशोरभाई वाणी, व्हा . चेअरमन सिध्दार्थ वाणी यांनी कृष्ण जन्माच्या शुभेच्छा दिल्या .








