नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील नवागाव येथे गावठाण जागेवर खेडपेड करु नका, असे सांगितल्याने दाम्पत्यास मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील नवागाव येथील प्रकाश जहागू वसावे यांच्या वडिलांनी शिवाजी नवसा वसावे याला गावठाण जागेवर खेडपेड करु नका, असे सांगितले.
याचा राग आल्याने अशोक शिवाजी वसावे याने प्रकाश वसावे यांचे वडील व आई यांना काठीने मारहाण केली. यात ते जखमी झाले. शिवाजी वसावे व राजेंद्र शिवाजी वसावे यांनी शिवीगाळ करत हाताबुक्यांनी मारहाण केली. याबाबत प्रकाश वसावे यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक काळे करीत आहेत.








