नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत जि.प.सदस्यांनी मांडला. दरम्यान धडगांव तालुक्यातील कालखेतपाडा येथे शाळेत जाणार पुल पोलीस दलाने अवघ्या चार दिवसात तयार केला. पोलीस दलाला चार दिवसात जमले. ते प्रशासनाला इतक्या वर्षात काजमला नाही. असा सवाल करत जि.प.सदस्यांनी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले.
नंदुरबार येथील जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा यहामोगी सभागृहात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा ऍड.सीमा वळवी समवेत मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, शिक्षण सभापती अजित नाईक, महिला बालकल्याण सभापती निर्मला राऊत आदी उपस्थित होते.
स्थायी समितीच्या सभेत जिल्ह्यातील शिक्षणाबाबत चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली. यावेळी जि.प.सदस्य विजयसिंग पराडके यांनी सांगितले की, धडगांव तालुक्यातील उमराणी कालेखेतपाडा येथे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पुराचा पाण्यातून जावे लागत होते.
याबाबत अनेक ठिकाणी बातम्या आल्यानंतरही प्रशासन सुस्तच होते. कालेखेतपाडा येथे पोलीस दलातर्फे अवघ्या चार दिवसात लोखंडी पुल उभारण्यात आला. पोलीस दलाला जे चार दिवसात जमते ते प्रशासनाला इतक्या वर्षातही जमले नाही. ही खेदाचीबाबत आहे. दरम्यान जि.प.सदस्य देवमन पवार यांनी नंदुरबार तालुक्यातील नवागाव जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिले ते चौथीचे वर्ग एकाच खोलीत भरत असल्याने विद्यार्थी शिक्षण कसे घेणार असा सवाल करत २७ विद्यार्थी शिक्षण घेत आहे तर याठिकाणी एकच शिक्षक त्याठिकाणी शाळेची पटसंख्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत जि.प.अध्यक्षा व मुख्याधिकार्यांनी या शाळेबाबत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. स्थायी सभेत अजिंडयावरील विषय वाचला सुरूवात झाली. यावेळी जि.प.सदस्या अर्चना गावीत पशुसंवर्धन विभागातील पदे तात्काळ भरण्यात यावा. असे सांगत कमी कर्मचार्यांमुळे कामावर परिणाम होणार नाही. याची दक्षता घेण्याचे त्यांनी सूचना दिल्या.
तसेच त्या पुढे म्हणाले की, आमच्या मतदार संघातील कामांसाठी आम्ही पाठपुरावा करतो मात्र समाज कल्याण विभागाकडून ठेकेदाराला परस्पर प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी समाज कल्याण सभापती रतन पाडवी यांनी सदर प्रमा नंदुरबार पंचायत समितीत पाठविण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान यावेळी जि.प.सदस्य विजयसिंग पराडके यांनी दुर्गम भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय परिस्थिती झाली असून तात्काळ रस्ते दुरूस्त करण्याची मागणी त्यांनी केली. यावर जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी खराब रस्त्याचा अहवाल तयार करण्याचा सूचना दिल्या.
धडगांव तालुक्यात मोठया प्रमाणावर बंगालचे डॉक्टर येवून डॉक्टरकी करीत आहे. ते डॉक्टर ओरंजनल आहे की, नकली याचा प्रशासनाने शोध घ्यावा व योग्य ती कारवाई करावी. असे जि.प.सदस्यांनी सांगितले.








