नंदुरबार l प्रतिनिधी
बँडेड कपड्यांच्या नावाचे लेबल लावून चक्क बनावट कपड्यांची विक्री केल्याचा प्रकार शहरात उघडकीस आला आहे. परदेशीपुरा व सिंधी कॉलनीत लिव्हाईस कंपनीच्या नावाचे लेबल लावून बनावट कपड्यांची विक्री होत होती. यामुळे संबंधित कंपनीची सुमारे दीड लाख रुपयांची फसवूणक झाली. याप्रकरणी दोन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार
शहरातील नगर परिषद परिसरात असलेल्या हरीओम हॅॅण्डलूम या दुकानात ४८ हजार रुपये किंमतीचे बनावट लेबल लावलेले ४८ हजार रुपये किंमतीच्या १२० जिन्स पॅन्ट, ११ हजार रुपये किंतीचे ३८ शर्ट खरेदी-विक्रीसाठी ठेवले होते. यामुळे अधिकृत कंपनीचे आर्थिक नुकसान केले. एकूण ५९ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. याबाबत फिल्ड ऑफिसर राकेश राम सावंत यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात संदीप श्रीचंद गुमनानी याच्याविरुद्ध प्रतिलीपी अधिकार अधिनियमचे ५१ व ६१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास गुंजाळ करीत आहेत.
तसेच सिंधी कॉलनीतील बॉम्बे ट्रेडर्स या गोडावूनमध्ये ८ हजार ५०० रुपये किंमतीचे बनावट लेबल असलेल्या १७ जिन्स पॅन्ट, ५२ हजार ५०० रुपये किंमीच्या १०५ जिन्स पॅन्ट आणि संजय जीन्स पॉईंट या दुकानातून ५ हजार ७०० रुपये किंमतीच्या १९ जिन्स पॅन्ट, २० हजार रुपये किंमतीच्या ४० जिन्स पॅन्ट असा एकूण ८६ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. याबाबत सचिन रमेश गोसावी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात अजय विनोद मंदाणा, संजय राजुकमार दावाणी यांच्याविरोधात प्रतिलिपी अधिकार अधिनियमचे कलम ५१ व ६३, ६४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत.








