नंदूरबार l प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत अनूसूचित जमातीच्या लाभार्थीना बांबू,मोहा वनोपज मालावर प्रक्रीया करण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.
मेवासी वनविभाग, तळोदा अंतर्गत बांबु, मोहा वनउपज मालावर प्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन नंदुरबार येथे हॉटेल डी.एस.के रेसिडेन्सी येथे प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा आणि उपवनसंरक्षक मेवासी वनविभाग, तळोदा यांच्यामार्फत आयोजित केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत अनूसूचित जमातीच्या लाभार्थीना बांबू, मोहा वनोपज मालावर प्रक्रीया करणे प्रशिक्षणाचे उदघाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उदघाटन प्रकल्प अधिकारी मैनक घोष यांनी केले तसेच सदर कार्यक्रमास उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांनी मोहा व बांबु विषयी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास म.राहा.वनसंरक्षक मनोज रघुवंशी तसेच धनंजय पवार, वनक्षेत्रपाल रामकृष्ण लामगे, भामरे, गवळी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकृष्ण लामगे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा) वडफळी,मोलगी यांनी केले. मोहा वनउपज बाबतीत यवतमाळचे तज्ञ प्रशिक्षक रवि पाटील यांच्या चमुने सविस्तर मार्गदर्शन प्रात्यक्षिके सह सविस्तर माहिती दिली.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम मध्ये अक्कलकुवा, तळोदा, मोलगी, काठी, वडफळी अक्राणी येथील लाभार्थी हजर आहेत. तसेच वनविभागाचे वनपाल शेख, निळे, पाटील व वनरक्षक गुरव, वाघ, गिरधर पावरा, यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले. सदर प्रशिक्षणास उत्फुर्त प्रतिसाद मिळालेला आहे. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनोज रघुवंशी सहा.वनरक्षक (प्रा.व वन्यजीव) मेवासी वनविभाग, तळोदा यांनी केले.








