शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे के.व्ही.पटेल.कृषि महाविद्यालय, शहादातर्फे
राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
के.व्ही.पटेल कृषि महाविद्यालय,शहादा भारताच्या स्वातंत्र्य दिनाची 75 वे वर्षे अमृत महोत्सव म्हणून साजरा करत आहे. त्यानिमित्ताने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थांनी त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.सहभागी विद्यार्थांना विषय स्पर्धेच्या अर्धा तास आधी दिला जाईल.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी.https://forms.gle/JyjvaKEpsDZEpmjG6
रजिस्ट्रेशनची वेळ व दिनांक 19/08/2022 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.माध्यम इंग्लिश,हिंदी, मराठी असून कमीत कमी शब्द मर्यादा 2000 शब्द आहे.स्पर्धा ऑनलाईन दि. 24 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत होणार आहे. पारितोषिक-प्रथम पारितोषिक रक्कम रुपये 701 व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक रक्कम रुपये 501 व प्रमाणपत्र,तृतीय पारितोषिक रक्कम रुपये 301 व प्रमाणपत्र असे आहे.निबंध स्पर्धेचे निबंध जमा करण्यासाठी WhatsApp ग्रुपला वेगळी लिंक पाठवली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.अशी माहिती प्राचार्य डॉ.पी.एल. पाटील यांनी दिली आहे.








