नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील आगामी ग्रा.पं. निवडणूकीसाठी नंदूरबार तालुक्यातील इच्छुकांची राष्ट्रवादीतर्फे शनिवारी मुलाखती घेण्यात येणार आहे.मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ.डॉ अभिजीत मोरे यांनी केले आहे.
नंदुरबार तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजु लागले आहेत . राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीने या निवडणुकांसाठी आपली कंबर कसली आहे . येत्या शनिवारी दि २० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वा . नंदुरबार तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जिल्हाध्यक्ष डॉ अभिजीत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे . सदर मुलाखती नंदुरबार येथील गिरीवीहार गेट समोरील राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात होणार असून सर्व इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुक्याध्यक्ष प्रदीप वना पाटील यांनी केले आहे .








