नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसा निमित्त खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत २० कि.मी.पुरुष, १० कि.मी.महिला , ६ कि.मी. ८ वी ते १० मुले व मुली असे गट होते. यावेळी सुमारे सर्व गट मिळून ५०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन हिरवी झेंडी दाखवून संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार डॉ. हीना विजयकुमार गावित, नंदुरबार जि.प.सदस्या डॉ. सुप्रिया विजयकुमार गावित, राजश्री गावित, डॉ.विक्रांत मोरे, सौ. ऐश्वर्या रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुली ६ कि.मी योगिता संजय वळवी, तलावडी आश्रमशाळा, तळोदा (प्रथम), अंजली दारासिंग पाडवी, महाजन हायस्कुल, धुळे (द्वितीय), सोनाली गणपत पाडवी, महाजन हायस्कुल, धुळे (तृतीय), मुले ६ कि.मी. जगन श्रीधर मेघे माध्यमिक हायस्कुल, हर्सूल (प्रथम), कुलदिप मंगलदास वसावे, शासकीय आश्रमशाळा, जळखे (द्वितीय)प्रशांत सुनिल पाडवी, तलावडी आश्रमशाळा, तळोदा (तृतीय) महिला १० कि.मी. मेहेक मंगलदास वसावे, कमला नेहरू ज्यु. कॉलेज, नंदुरबार (प्रथम), आरती अर्जून पावरा, आश्रमशाळा, राजबर्डी (द्वितीय), अश्विनी काटोले, शिरसोली जळगांव (तृतीय), पुरुष २० कि.मी.दयाराम रमेश गायकवाड, नाशिक (प्रथम), दयानंद विष्णु चौधरी, नाशिक (द्वितीय), भगतसिंग रामसिंग वळवी, पि.के.पाटील कॉलेज, नंदुरबार (तृतीय) यांनी यश संपादन केले.
सर्व गटातील विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र ना.डॉ.विजयकुमार गावित व डॉ. कुमुदिनी गावित यांच्या हस्ते देण्यात आले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक डॉ.ईश्वर धामणे, बळवंत निकुंभ, योगेश सोनवणे, सुनिल मोरे, प्रा. दुर्योधन राठोड, दिपेश धामणे, धनराज अहिरे, निलेश गावित, मोहीत राज अहिरे, दिपेश गायकवाड, रोहीत गोंधळी यांनी सहकार्य केले.








