शहादा l प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने गझल गायन स्पर्धा महात्मा गांधी सभागृहात नुकतीच संपन्न झाली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गझल गायन स्पर्धेचे शहादा महाविद्यालयाच्या महात्मा गांधी सभागृहात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस.डी. सिंदखेडकर, डॉ. एम. के. पटेल, सांस्कृतिक मंडळ प्रमुख प्रा.डाॅ. सतीश भांडे उपस्थित होते.
या स्पर्धेत 13 स्पर्धकांनी सहभाग घेतला. परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध गझलकार अनंत नांदुरकर अमरावती व प्रा.महेंद्र खेडकर शहादा हे उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल असा, प्रथम-राजेश्वरी संजय जाधव (वरिष्ठ महाविद्यालय शहादा) द्वितीय-मंगला अभिमान बर्डे (शिक्षणशास्त्र महाविद्यालय शहादा) तृतीय- दर्शन चित्तरंजन भावसार (जीटीपी महाविद्यालय नंदुरबार) कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डाॅ.एम.एम.जोगी यांनी केले.
आभार प्रा.डाॅ. चंद्रशेखर सुतार यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील,प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.