शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कँम्पस मुलाखतीद्वारे विविध ट्रेडच्या 41 प्रशिक्षणार्थ्यांची सुरत येथील नामांकित कंपनीत निवड झाली आहे.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सन 2021-22 शैक्षणिक वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यासाठी वारे एनर्जीस लिमीटेड सुरत या कंपनीद्वारे आयोजित कँम्पस मुलाखतीद्वारे फिटर, विजतंत्री आणी कोपा व्यवसायाच्या 41 प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात आली.
कँम्पस मुलाखतीसाठी कंपनीचे मँनेजर भुवनेश कुमार आणि कंपनीचे एच.आर.भुपेंद्र सिंग हे स्वतः औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हजर राहून निवड प्रक्रिया पुर्ण केली.तसेच निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्याना दि.20 पासून कंपनीत रुजू होण्यासाठी आँफर लेटर दिले.
निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांनी अभिनंदन केले. कँम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा.आर.एस.पाटील, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.डी.एम.पटेल, औ.प्र.संस्थेचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी भरत पाटील तसेच औ.प्र.संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे विषेश सहकार्य लाभले.