शहादा l प्रतिनिधी
जीवन साधना विद्या प्रसारक मंडळ लोणखेडा संचलीत माध्यमिक विद्यालय बिलाडी त. सा. येथे जागतिक आदिवासी दिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना पाटील यांनी आपल्या मनोगतात जागतिक आदिवासी दिनाचे महत्व सांगितले. सदर कार्यक्रमास मुख्याध्यापिका वंदना पाटील यांच्या सह शिक्षकवृंद मनीषा पाटील,शुभागिनी पाटील,सचिन बागले,मिलिंद पगारे,हर्षल चौधरी, प्रविण मोरे,सिद्धार्थ सामुद्रे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.