नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील हॉटेल गौरवसमोर मालवाहतुक गाडीने दुचाकीस्वाराला ठोस दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील मलकवाडा येथे राहणार्या सलमान खान पठाण हा मोटरसायकल (क्र.एम.एच.०४-सी.डब्ल्यु.७१०४) हिच्यावर रनाळयाकडून नंदुरबारकडे येत असतांना धुळे-नंदुरबार रस्त्यावरील हॉटेल गौरव पॅलेससमोर मालवाहतुक करणारी गाडी (क्र.एम.एच.३९-ए.डी.१२०२) यावरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहनाला ऑव्हरटेक करतांना मोटरसायकलला ठोस दिली.
या अपघातात सलकान खान जहागीरखान पठाण (२२) याला गंभीर दुखापत होवून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अफसरखान ललित खान पठाण रा.मलकवाडा (नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात संतोष अशोक भडागे रा.आष्टा (ता.नंदुरबार) याच्या विरूध्द भादंवि कलम ३०४ (अ) २७९, ३३८, ४२७ मोटरवाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि नंदा पाटील करीत आहे.