Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोरद येथे आदिवासी दिनानिमित्त सांस्कृतिक कलाकृतीचे दर्शन घडवत भव्य रॅली

team by team
August 9, 2022
in राजकीय
0
बोरद येथे आदिवासी दिनानिमित्त सांस्कृतिक कलाकृतीचे दर्शन घडवत भव्य रॅली

बोरद l प्रतिनिधी

तळोदा तालुक्यातील बोरद येथे विश्व आदिवासी दिनानिमित्त शहादा तळोदा चौफुलीवर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रसंगी गावातून भव्य रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदिवासी संस्कृतीच्या विविध कलाकृतीचे दर्शन घडले.

यावेळी बोरद येथील आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी क्रीडामंत्री पद्माकर वळवी हे होते. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. समाज कल्याण सभापती नरहर ठाकरे ,कॉ.मंगलसिंग चव्हाण , तळोदा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहिदास पाडवी तसेच संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष प्रवीण वळवी हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी विश्व आदिवासी दिनाचे महत्त्व सांगत आदिवासी क्रांतिकारकांच्या इतिहासाला उजाळा दिला दरम्यान शहादा, तळोदा चौफुलीपासून आदिवासींच्या पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला.

तत्पूर्वी माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी कॉ. मंगलसिंग चव्हाण त्याचबरोबर सुकलाल ठाकरे,माजी समाजकल्याण सभापती नरहर ठाकरे,तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय पाटील त्याचबरोबर तुळाजा, मालदा, गोंडाळे, न्यूबन, तसेच परिसरातील बरेच आदिवासी बांधव यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉ. दयानंद चव्हाण यांनी परिश्रम घेतले त्याचबरोबर गावातून आदिवासींच्या पारंपारिक वाद्य वाजवत गावातून भव्य दिव्य रॅली काढण्यात रॅली काढण्यात आली यावेळी या रॅलीमध्ये माजी मंत्री पद्माकर वळवी यांनीही सहभाग नोंदवला त्याचबरोबर आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी यांनीही या ठिकाणी आपला सहभाग नोंदवला.

प्रसंगी अनेक आदिवासी बांधवांनी आपली पारंपारिक वेशभूषा या ठिकाणी परिधान केली होती. विविध आपल्या समाजातील वाद्य या ठिकाणी आणून त्या वाद्यांच्या गजरात या मिरवणुकीत प्रारंभ झाला .गावातील प्रत्येक गल्लीत ही रॅली आदिवासी समाजाच्या जयघोषयात निघाली.शेवटी बिरसा मुंडा चौकात याचा समारोप झाला.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर तालुका आदिवासी उत्सव समितीतर्फे भव्य मोटार सायकल रॅली

Next Post

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; तरुण ठार तर एक जण जखमी

Next Post
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; तरुण ठार तर एक जण जखमी

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; तरुण ठार तर एक जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add