नंदूरबार l प्रतिनिधी
प्रोजेक्ट स्कोल , इंडियन सोसायटी ऑफ अग्रिबिझनेस प्रोफेशनल्स ( आयसँफ संस्था) व जिल्हा आरोग्य विभाग नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने प्राथमिक आरोग्य केंद्र लहान शहादे अंतर्गत असंसर्गजन्य रोग निदान मेगा शिबीर व कोविंड लसीकरण शिबिर घेण्यात आले .
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, प्रोजेक्टहेड दीप्ती महाजन न्यू दिल्ली , राज्य समन्वयक छाया भट यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरासाठी गावातील 147 नागरिकांनी मेगा शिबिराचा लाभ घेतला आहे.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.पंकज कदम, डॉ.जयेश सूर्यवंशी, डॉ. राकेश पाटील , डॉ. राजेंद्र आगळे ( आयसँफ संस्था ) ग्रामपंचायत सरपंच सुपाबाई रामा पाडवी ,उपसरपंच भगवान मोहन पाटील,जिल्हा समन्वयक बाळासाहेब घुले व विशाल घरटे,गिरीश बावा , दिनेश पावरा,निकिता टेकाळे , दिलिप राठोड आणि परिचारिका रेखा बाविस्कर,मिना भोई ,ज्योती जावरे,सरला भामरे व आशा सेविका आदी उपस्थित होते.