नंदुरबार ! प्रतिनिधी
खाजगी हॉस्पिटलनी कोविडची तिसरी लाट लक्षात घेता ऑक्सिजन बेड्ची संख्या वाढवावी असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खाजगी हॉस्पिटलच्या प्रतिनिधींच्या बैठकीत केले.यावेळी त्यांनी कोविडबाबत उपाययोजनांचा आढावा घेतला.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, डॉ.राजेश वसावे, डॉ.के.डी.सातपुते आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती खत्री म्हणाल्या, खाजगी हॉस्पिटलनी कोविडची तिसरी लाट लक्षात घेता ऑक्सिजन बेड्ची संख्या वाढवावी आणि त्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. ऑक्सिजन पुर्ततेसाठी जम्बो सिलेंडरची संख्या वाढवावी. तिसऱ्या लाटेच्यादृष्टीने आवश्यक तयारी पुढील महिन्याभरात करावी. प्रशासनाच्यावतीने खाजगी हॉस्पिटल्सना आवश्यक व्यवस्था करण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.बैठकीस जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटलचे प्रतिनिधी उपस्थित होते.