Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सरपंचाविरुद्ध अविश्वास ठरावाबाबत जयनगर येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन

team by team
August 3, 2022
in राजकीय
0
सरपंचाविरुद्ध अविश्वास ठरावाबाबत जयनगर येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील जयनगर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती. मिनाबाई अंकुश सोनवणे यांचे विरुद्ध दाखल झालेल्या तसेच 25 जुलै 2022 रोजी तीन चतुर्थश मताने मंजूर झालेल्या अविश्वास प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जयनगर,ता. शहादा येथे 4 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष ग्रामसभा घेण्याकरीता प्रचलित नियमान्वये सभेची गणपुर्ती आवश्यक राहील. आवश्यकता असल्यास सभेच्या दिवशी अविश्वास ठराव संमत करणेकामी शिरगणना करण्याच्या साध्या पद्धतीने मतदान घेण्यात येईल. यासाठी 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी ग्राह्य धरुन 5 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात येईल. या दिवशी विशेष ग्रामसभेत फक्त अविश्वास ठरावावर चर्चा होईल इतर विषयांवर चर्चा होणार नाही.

विशेष ग्रामसभेत उपस्थित राहून शिरगणना पद्धतीने मतदान केलेल्या सदस्यांच्या साध्या बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला असेल तर सदरचा अविश्वास ठराव संमत झाला आहे असे समजण्यात येईल. विशेष ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून शिरगणना पद्धतीने मतदान केलेल्या सदस्यांच्या साध्या बहुमताने अविश्वास फेटाळला असेल तर सरपंच पद कायम राहील.

विशेष ग्रामसभेत कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन तसेच सॅनिटायझरचा वापर व अन्य अनुषंगिक बाबींचे पालन करणे आवश्यक असेल. ग्रामसभेमध्ये येतांना ग्रामपंचायतीच्या मतदारांनी सोबत राज्य निवडणूक आयोगाने विहीत केलेल्यापैकी कोणताही ओळखीचा पुरावा सोबत बाळगणे आवश्यक राहील असे उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

चिनोदा येथे नागपंचमीनिमित्त श्री.नागेश्वर मंदिरात हजारो भाविकांनी घेतले दर्शन

Next Post

संवाद’ उपक्रमातंर्गत समाज कल्याण अधिकाऱ्यांचा, शासकीय वसतीगृहात एक दिवस मुक्काम

Next Post
संवाद’ उपक्रमातंर्गत समाज कल्याण अधिकाऱ्यांचा, शासकीय वसतीगृहात एक दिवस मुक्काम

संवाद’ उपक्रमातंर्गत समाज कल्याण अधिकाऱ्यांचा, शासकीय वसतीगृहात एक दिवस मुक्काम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

June 1, 2026
शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

June 1, 2026
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

June 1, 2026
१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

June 1, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

June 1, 2026
विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add