Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

संवाद’ उपक्रमातंर्गत समाज कल्याण अधिकाऱ्यांचा, शासकीय वसतीगृहात एक दिवस मुक्काम

team by team
August 3, 2022
in राज्य
0
संवाद’ उपक्रमातंर्गत समाज कल्याण अधिकाऱ्यांचा, शासकीय वसतीगृहात एक दिवस मुक्काम

नंदुरबार l प्रतिनिधी

समाज कल्याण विभागामार्फत सुरु असलेल्या शासकीय वसतीगृहात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबाबत तक्रारी केल्या जातात, याबाबत त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी समाज कल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी एक दिवस शासकीय वसतीगृहात मुक्काम केला व तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधुन त्याच्या समस्या समजून घेतल्या.

समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ‘संवाद कार्यक्रम’ हा अभिनव उपक्रम राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या ‘संवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील सर्व समाज कल्याण अधिकारी यांनी थेट विद्यार्थ्यांसोबत 27 व 28 जुलै रोजी शासकीय वसतीगृहात रात्रभर मुक्कामी राहून विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला.

नंदुरबारचे सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, धर्मराज नगर, नंदुरबार येथे तर समाज कल्याण निरीक्षक एस. के. गांगुर्डे व डी. बी. कोकणी यांनी शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृह, मोहिदे त.श.ता.शहादा येथील वसतीगृहात मुक्काम करुन विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

विद्यार्थ्यांच्या सूचना व मागणीनुसार त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी कौशल्य विकास कार्यक्रम तसेच विविध तज्ञ व्यक्तींचे नियमित व्याख्याने आयोजित करण्याबाबतचे सूचना त्यांनी गृहप्रमुखांना दिल्यात. तसेच वसतिगृहातील गृहप्रमुख व गृहपालांनी वसतीगृहात राहण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत भोजन देखील केले.

‘संवाद’ उपक्रमातंर्गत आयुक्त डॉ. प्रशात नारनवरे यांनी देखील स्वत: पुणे येथील वसतिगृहात मुक्काम करुन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांना मिळणाऱ्या विविध सुविधा, जेवण व विद्यार्थ्यांमार्फत राबविण्यात येणारे उपक्रमाबाबत माहिती जाणून घेतली. तर प्रादेशिक उपायुक्त डॉ.भगवान वीर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील वसतिगृहात मुक्काम करुन विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. या उपक्रमाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सरपंचाविरुद्ध अविश्वास ठरावाबाबत जयनगर येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन

Next Post

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे 75 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प,पहिल्या टप्प्यात 25 हजार वृक्षारोपण पुर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add