Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार तहसीलतर्फे महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान

team by team
August 2, 2022
in राज्य
0
नंदूरबार तहसीलतर्फे महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार तहसिल कार्यालयात महसूल दिन संपन्न.
नंदुरबार तहसिल कार्यालय, येथे आज महसुल दिनानिमित्त आयोजित उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान सोहळा, लाभार्थ्यांना धनादेश, विविध दाखले, शिधापत्रिका व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, नंदूरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसिलदार नितीन पाटील, आर. ओ.बोरसे आदी उपस्थित होते.

यावेळी मान्यवराच्या हस्ते सातबारा वरील पोटखराब वर्ग अ क्षेत्र वाहितीलायक झाल्यावर केलेल्या सातबारा उतारा फेरफार पत्रकाचे पत्रकाचे वाटप, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नविन शिधापत्रिका, विधवा व निराधार प्राधान्य कुटूंब लाभार्थ्याचे प्रमाणपत्र, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत मंजूर धनादेश वाटप करण्यात आले.

तसेच नैसर्गिक आपत्ती खरीप 2021 चे दुष्काळ अनुदानाचे 22 कोटी 53 लक्षाचा धनादेश शेतकऱ्यांना वितरीत करण्यासाठी युनियन बॅंक ऑफ इंडिया यांना प्रातिनिधीक स्वरुपात प्रदान करण्यात आला.

महसूल दिनानिमित्त तहसिल कार्यालयातील उल्लेखनिय कार्य केलेले नायब तहसिलदार नितीन पाटील, अव्वल कारकुन प्रिती पाटील, महसूल सहायक दौलत वळवी, मंडळ अधिकारी मदन कावळे, तलाठी बाळू धनगर, शिपाई गिरीष देवांग, कोतवाल किशोर पाडवी यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री व पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी तर आभार प्रदर्शन नितीन पाटील यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे लोकमान्य बाळगंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Next Post

आकांक्षित जिल्हा कृषी विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

Next Post
आकांक्षित जिल्हा कृषी विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

आकांक्षित जिल्हा कृषी विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add