नंदुरबार ! प्रतिनिधी
उमर्दे खुर्द येथील ग्रामपंचायतीतर्फे भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण गावातील कोरोना योध्दा यांच्या हस्ते करण्यात आला.
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द ग्रामपंचायतीत ध्वजारोहण गावातील कोरोना योध्दा विठाबाई सुदाम मराठे हस्ते करण्यात आले. या साठ वर्षीय महिलेने कोरोना वर यशस्वीरीत्या मात केली. म्हणून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला सरपंच अरविंद ठाकरे, उपसरपंच सागर साळुंखे, तलाठी किरण सूर्यवंशी, पोलीस पाटील दिलीप चौधरी, सदस्य राजपूत, कैलास वळवी, रवींद्र पेटकर, महेंद्र गिरासे, गजानन कुटे,शब्बीर खाटीक,रमेश पेटकर, सुरेश जाधव,प्राचार्य के. जी. मराठे, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षक कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.