तळोदा l प्रतिनिधी
तालुक्यातील राजविहिर येथे बिबट्याने शेळी फस्त केली आहे. बिबट्याचा मुक्त वावरामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.२८ जुलै रोजी राजविहिर शेत शिवारात दुपारी साधारणत: १२ ते २ वाजेच्या सुमारास बिबट्याने राजविहिर गावालगत असलेल्या सुपडू जालमसिंग पाडवी यांच्या ऊसाच्या शेतात एक शेळी ओढून आणल्याचे शेतमालकास दिसून आल्याने
सदर माहिती तात्काळ वन विभागाला कळविण्यात आली. बिबट्याचा संचाराने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान दि.२५ जुलै रोजी जुने गोपाळपूर शिवारात पहाटेच्या सुमारास बिबट्याने चुनिलाल जांभोरे यांच्या घराच्या ओट्यावरून एक कोंबडी तसेच परिसरातील पाळीव श्वानाला बिबट्याने फस्त केल्याची घटना घडली होती. त्यामुळे वन विभागाने ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.








