Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिथे सत्ता ते तिथे: ज्यांनी आमदार होवू दिले नाही ते त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले : आ.आमश्या पाडवी

team by team
July 29, 2022
in राजकीय
0
जिथे सत्ता ते तिथे: ज्यांनी आमदार होवू दिले नाही ते त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले : आ.आमश्या पाडवी

तळोदा l प्रतिनिधी

 

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना आमदार होऊ दिले नाही. त्यांच्याच मांडीवर आज चंद्रकांत रघुवंशी जाऊन बसले आहेत. म्हणून संघटना नव्याने पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. असे प्रतिपादन आ.आमश्या पाडवी यांनी केले.

तळोदा येथील माळी समाज मंगल कार्यालयात शिवसेना पक्षाच्या वतीने संसरपयोगी साहित्य वाटप कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधानपरिषद आ.आमश्या पाडवींसह संपर्क प्रमुख अरुण चौधरी, जिल्हा समन्वय दिपक गवते, जि.प.सभापती तथा जिल्हा प्रमुख गणेश पराडके, प्रदेश संघटक सुरेखा वाघ, युवा सेना जिल्हा प्रमुख अर्जुन मराठे, माजी नगरसेवक विनोद चौधरी, के.जी परदेशी, बच्छुसिंग परदेशी, किशोर परदेशी, विलास काकडे, युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटील, गिरीश मराठे, घारू कोळी आदी उपस्थित होते.

 

 

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उपस्थित ५०० कुटुंबीयांना संसारपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी आ. पाडवी पुढे बोलताना म्हणाले की, सत्ता असतांना दोघेही नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, आता सत्ता बदल होतात ते पक्ष सोडून गेलेत सत्ता जिथे ते तिथे ते असतात अशी खोचक टीका केली. उध्दव ठाकरे यांना काही आमदार सोडून गेले, मात्र आजही बाळासाहेब यांचे नाव वापरून सत्ता स्थापनेचा प्रयत्न करीत आहेत,

बाप चोरण्याची संस्कृती रुजविण्याचे काम त्यांनी केले आहे. कोणत्याही पक्षाने आजपर्यंत आदिवासी समाजाच्या व्यक्तीला जिल्ह्यातून विधानपरिषदेचे आमदार केलेले नाही, मात्र शिवसेनेने ते करून दाखवलं आहे. तळोद्यातील शिवसेना नेहमीच सर्वसामान्यांच्या जनतेसाठी उभी राहते. आगामी निवडणुकीत पालिकेवर सेनेचा भगवा फडकवण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले.

 

जिल्हा समन्वय दिपक गवते, सह संपर्क प्रमुख अरुण चौधरी, यांनी मनोगतात जिल्ह्यातून पक्ष बदलून गेलेले आमदार रघुवंशी यांच्यावर टीका करत ते आपले नसल्यामुळे त्यांचे जाण्याचे दुःख नसल्याचे सांगितले. भविष्यात सर्वांनी उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. याशिवाय सदस्य नोंदणी व प्रतिज्ञापत्र अधिकाधिक सादर करण्याचे आवाहन केले.

 

नगरसेविका प्रतीक्षा दुबे यांनी, सत्ते स्थापनेसाठी एक गट एकूण ५६ आमदार व खासदार घेवून गेलेत, आपण भविष्यात १५६ निवडून आणू, जे आपल्यातून निघून गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते अशी उपरोधात्मक टीका दुबे यांनी प्रस्तावनेतून केली.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हितेंद्र पाटील यांनी केले. आभार जितेंद्र दुबे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहर प्रमुख जितेंद्र दुबे,संजय पटेल, पुत्तन दुबे, सूरज माळी, विजय मराठे, जगदीश चौधरी, विपुल कुलकर्णी, श्रावण तिजविज, जयेश सुर्यवंशी, नितीन ठाकरे, विनोद वंजारी, नितेश सोनार, काशिनाथ कोळी, अमन ठाकरे, कल्पेश सुर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.

 

 

बातमी शेअर करा
Previous Post

बिबट्याने शेळी केली फस्त, मुक्त वावरामुळे भितीचे वातावरण

Next Post

चोरी करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
चोरी करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

चोरी करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add