नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा बसस्थानकात बसमध्ये खाण्यापिण्याचे सामान विकुन गुजारा करणाऱ्या दोन सर्व सामान्य फेरीवाल्यांच्या इमानदारीची प्रचिती आली आहे.


शहादा बसस्थानकात फेरीवाला म्हणुन काम करणाऱ्या प्रकाश गोरे आणि मुकेश वाडीले या दोघांना बस मध्ये सापडलेले पाकीट त्यांनी आगार व्यवस्थापकांमार्फत प्रवाश्याला परत केले आहे. या दोघांना बस मध्ये सामान विक्री दरम्यान पाकीट आढळुन आले होते. त्यात 18 हजार 500 रुपये रोकडसह आधारकार्ड, एटीएम कार्डसह महत्वाची कागदपत्रे होती. हे पाकीट मालेगाव येथील प्रवासी मोहम्मद मोबीन यांच्या मालकीचे असल्याचे तपासात समोर आल्यानंतर त्यांचा शोध घेवुन ते त्यांना परत करण्यात आले आहे.
दिवसभर बस स्टॅडवर सामान विक्रीकरुन हातावरती उदरनिर्वाह करणाऱ्या या फेरीवाल्याच्या या प्रामाणिकतेबद्दल सर्वत्र कौतुक देखील केल्या जात आहे.








