नंदुरबार ! प्रतिनिधी
गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात विविध पोस्ट फिरत आहे. ही बातमी खोटी आहे.याबाबतचे ट्विट महाराष्ट्राचे डी.जी.पी.संजय पांडे यांनी काल केले आहे.
सोशल मीडियावर विविध मॅसेज प्रसारित होत असतात.त्यात विशेष मॅसेज असतील तर ते खूप व्हायरल होतात.त्यात किती तथ्य आहे हे ही बघितले जात नाही.गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात विविध पोस्ट फिरत आहे.त्यातही नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आय.पी.एस. कृष्णकांत हे आल्याचे मॅसेज विविध व्हॉटसअप गृपवर फिरत होते.तर काही व्हॉटसअप ग्रुववर दुसरे अधिकाऱ्यांची जिल्ह्यात नियुक्त झाले असल्याचे मॅसेज फिरत होते.मात्र हे सर्व मॅसेज खोटे होते.नंदुरबार जिल्ह्यातच नाही तर राज्यभर असे फेक मॅसेज फिरत होते.
याबाबत महाराष्ट्राचे डी.जी.पी.संजय पांडे यांनी काल एक ट्विट केले त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांची बनावट बदली यादी सोशल मीडियावर फिरत आहे. बदली पोस्टिंगबाबत अद्याप निर्णय घेणे बाकी आहे. या बनावट बातमीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. असे त्यांनी ट्विट केले.राज्य शासनाने अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी ३० ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवली आहे.नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची दि. १५ ऑगस्ट रात्री पर्यंत बदली झालेली नाही.त्यामुळे अशा फेक मॅसेज वर विश्वास ठेवू नये.नंदुरबार जिल्ह्यात पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हे कर्तव्य दक्ष अधिकारी मिळाले आहेत.त्यांच्या कारकिर्तीत अनेक गुन्हेगारांवर वचक बसला असून असे चांगले अधिकारी कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी जिल्ह्यासाठी नेहमी लाभदायक असतात.