नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय डाक विभागामार्फत इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दीनदयाल स्पर्श योजना’ फिलेटली शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. ‘दीनदयाल स्पर्श योजना’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकिटे जमविणे आणि तिकिटांचे संशोधन करण्याचा छंद निर्माण करण्याचा डाक विभागाचा मानस आहे.
या योजनेसाठी विद्यार्थ्यांची डाक विभागामार्फत फिलेटली प्रश्नमंजुषा आणि फिलेटली प्रकल्प या आधारावर मुख्य पोस्टमास्तर, जनरल मुंबई सर्कल, मुंबई कार्यालयामार्फत निवडक विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन अशा विद्यार्थ्यांना एका वर्षांसाठी सहा हजार रुपयाची शिष्यवृत्ती देण्यात येईल.
योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांचे स्वत:चे फिलाटली डिपॉझिट खाते (पीडीए) असणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांना 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज सादर करता येईल. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन धुळे डाक विभागाचे प्रवर अधिक्षक प्रतापराव सोनवणे यांनी केले आहे.