नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात 92 वस्तीशाळा शिक्षक अप्रशिक्षित म्हणून कार्यरत असून त्यांना सेवांतर्गत प्रशिक्षण मिळावे प्रशिक्षणा अभावी वस्तीशाळा शिक्षक नियमित वेतनश्रेणीच्या लाभापासून वंचित असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत असून जिल्ह्यातील 19 प्रशिक्षित वस्तीशाळा शिक्षक आपल्या हक्काच्या नियमित वेतनश्रेणी पासून वंचित असल्याने वस्तीशाळा शिक्षकांच्या प्रश्नांना शिक्षक परिषदेने न्याय देण्याची भावनिक साद धडगाव येथील शिक्षक संपर्क मेळाव्यात वस्तीशाळा शिक्षकांनी मांडली.
जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न व समस्या तालुकास्तरावर जाऊन जाणून घेण्याच्या उद्देशाने शिक्षक परिषतर्फे जिल्हाभरात राबविण्यात येत असलेल्या शिक्षक संपर्क अभियानातंर्गत पाचवा शिक्षक संपर्क मेळावा धडगाव येथिल भोई समाज भवनात राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला .
प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन करून” हम विजय की और बढते जा रहे ” या प्रेरणादायी गीताने करण्यात आली..
प्रास्ताविकात धडगाव तालुका अध्यक्ष भिका पावरा यांनी धडगाव शाखेची निर्मिती शिक्षक परिषदेमार्फत केलेल्या कार्याचा आढावा व सामाजिक समरसता जपण्यासाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
कपात केलेल्या रकमेचा जीपीएफ हिशोब नाही, दिव्यांग प्रमाणपत्र असून दिव्यांग भत्ता वेतनात लागू नाही ,एकतर वेतन श्रेणी चा फरक अदा केला नाही, एम एस सी आय टी पूर्ण करून देखील वेतनवाढ थांबविण्यात आली, एकाच पदावर काम करणाऱ्या शिक्षकांचे वेतन वाढीतील तफावत बाबत ,भविष्य निर्वाह निधीच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याबाबत ,गटशिक्षणाधिकारी या पदासाठी व्यवसायिक पात्रता b.ed करावी , सेवा पुस्तकांच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी तालुकास्तरावर कॅम्पचे आयोजन करणे प्रशिक्षित शिक्षक नियमित वेतनश्रेणी पासून वंचित दरवर्षी बदल्या पूर्वी पदोन्नती राबविणेबाबत ,
वरिष्ठ व निवड श्रेणी बाबत पी एफ एम एस प्रणाली बाबत प्रशिक्षण व्हावे ,एम डी एम माहिती भरण्याससाठी रेंज कमी असल्याने अतिदुर्गम भागास विशेष मुदतवाढ मिळणेबाबत , भविष्य निर्वाह निधी ऑनलाइन होणेबाबत व दरवर्षी स्लिप मिळणेबाबत या विषयाबाबत प्रशासकीय स्तरावरून अतिशय संथ गतीने कामकाज सुरू असुन त्यामुळे शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे उपस्थिती शिक्षकांची शिक्षण विभागाच्या प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून आपले प्रलंबित प्रश्न उपस्थित केले.
विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल विभागीय उपाध्यक्ष राकेश आव्हाड विभागीय सदस्य आबा बच्छाव जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय सूर्यवंशी , घडगावचे पालक किशोर ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी धडगाव तालुकाध्यक्ष भिका पावरा , पदोन्नती ऋषिकेश पावरा तळोदा तालुका कार्यवाह रणधीर भामरे यांची उपस्थिती लाभली.
यावेळी शिक्षक परिषदेच्या कामावर प्रेरित होऊन , रामदास पावरा, बाना पावरा, जव्हार पावरा यांनी शिक्षक परिषदेमध्ये प्रवेश केला.
अध्यक्षीय भाषणात राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी संघटनेचे महत्व संघशक्ती चे फायदे ,शिक्षक परिषदेची शिस्त, कार्यपद्धती विषयी माहिती देऊन, दुर्गम भागातील संपर्क मेळाव्यात मांडल्या जाणाऱ्या प्रश्नांना तसेच वस्तीशाळा शिक्षकांच्या प्रश्नांना जिल्हास्तर, राज्य स्तरावर सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्यान प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाईदास पावरा , यशवंत(लखन) पावरा, रमेश नवले, दिपक बनसोडे, रामु पावरा, विजय पावरा,रामदास पावरा, नितीन काळे, मंगेश पाडवी, आदींनी अनमोल सहकार्य केले ,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश भट यांनी केले ,तर प्रदीप दरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.








