नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्री जैन अलर्ट ग्रुप व रोटरी क्लब नंदनगरी यांच्यामार्फत आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे ५४ दात्यांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान केले. जैन समाजाच्या भैरवनाथ भवनात रक्तदान शिबिराचे उद्घाटन जैन समाजाचे अध्यक्ष मदनलाल जैन यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाले.
यावेळी जैन समाजाचे देवेंद्र जैन, नरेंद्र जैन, भावेश जैन, महिपाल जैन, रोटरीचे माजी अध्यक्ष प्रीतीश बांगड, दिनेश साळुंखे, फक्रुद्दीन जलगुनवाला, इसरार सय्यद, प्रवीण येवले, शीतल पटेल, जितेंद्र सोनार, राहुल पाटील,
प्रोजेक्टचे चेअरमन विकी जैन, आकाश जैन, गौतम जैन व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. रक्तदान करणार्या सर्व रक्तदात्यांना भेटवस्तू व प्रशस्तिपत्रक देण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयातील रक्त संकलन टीमचे सहकार्य लाभले.