धडगांव | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील उमराणी येथे लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप करण्यात आले.आदिवासी विकास विभागाची खावटी योजना आदिवासींना आधार ठरत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागातील खावटी किट वाटप करण्यापुर्वी प्रत्येक कुटूंबातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट २००० रू अनुदान खात्यावर जमा करण्यात आले. व उर्वरित अंदाजे २००० रू. किंमतीचे अन्नधान्य, कडधान्य, व इतर जीवनावश्यक वस्तूंची वाटप करण्यात येतात.या किट मध्ये मटकी १ किलो, चवळी २ किलो, हरभरा ३ किलो, पांढरा वटाणा १ किलो, तुरदाळ २ किलो, उडीद डाळ १ किलो, मीठ ३ किलो, गरम मसाला ५०० ग्रम, शेंगदाणा तेल १ लिटर, मिरची पावडर १ किलो, चहा पावडर ५०० ग्रम, साखर ३ किलो, असे प्रति कुटूंबाला १९ किलो प्रमाणे खावटी किट वाटप करण्यात येते.
कोरोना काळात राज्यातील आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी खावटी अनुदान येाजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ५८१ नागरिकांच्या बँक खात्यावर एकूण २८ कोटी ७२ लाख ६२ हजार रुपये जमा करण्यात आले असून ६४ हजार ३४४ आदिवासी कुटुंबांना खावटी कीट वितरीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १ लाख ५४ हजार ९१२ कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
धडगांव तालुक्यातील उमराणी येथे लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप करण्यात आले.शिक्षक एस.जी.सोनवणे, जी.पी.पाटील, एन.ए.ननवरे, पी.डी.निझरे, सी.एम.जाधव यांनी स्वःता किट वाटप केले. तर गावाचे पंच म्हणून सिमा दिलीप पावरा, पोलीस पाटील अनिता हेमंत पावरा उपसरपंच, आकाश मालसिंग पावरा ग्राम पंचायत सदस्य, रमेश पावरा ग्रा.पं.सदस्य, कसा पावरा, मानकर पावरा, अर्जुन पावरा, राण्या पावरा, भरत पावरा, ठुमला पावरा,जयसिंग पावरा,अनिल पावरा आदि ग्रामस्थ उपस्थिती होते.